Published On : Sun, Sep 3rd, 2017

गणेशोत्सवामुळे समाजातील सर्व घटक एकत्र येतात- देवेंद्र फडणवीस

CM Fadanvis

नागपूर : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवात वेगवगळया प्रकारच्या समाजाभिमूख देखाव्याचे सादरीकरण होते. त्यातून समाजातील एकता व एकात्मतेचे दर्शन घडते. या उत्सवामुळे समाजातील सर्व घटक एकत्र येतात. उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. तसेच सार्वजनिक गणेश मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या आकर्षक व कलात्मक देखाव्यांची पाहणी केली. सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार सहनिवास गणेशोत्सव मंडळात जनतेला गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘समाजातील सर्व घटकांना त्यांच्या जीवनात सुख, समृध्दी, आरोग्य मिळो अशी मी प्राथर्ना करतो’.

हिलटॉप गणेश उत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली. यावेळी आमदार प्रकाश गजभिये, आमदार सुधाकर कोहळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. पत्रकार सहनिवास गणेश उत्सव मंडळात पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी आदींनी त्यांचे स्वागत केले. धरमपेठ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी श्री. बाबा मेंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले.

मोतीबाग गणपती सेना उत्सव मंडळ येथे जी.एन. पटनाईक यांनी स्वागत केले व मेट्रोचा देखावा पाहतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी आजच मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आनंद घेत आहे’. शनिवारी कॉटन मार्केट येथील शंकर विलास सार्वजनिक गणेश मंडळ, न्यू इतवारी येथील अशोक स्तंभ गणेश उत्सव मंडळ, दारोडकर चौक येथील सती गणेश उत्सव मंडळ, आंबेडकर चौकातील बाल गणेश उत्सव मंडळ, दर्शनी कॉलोनीतील छत्रपती शिवाजी गणेश उत्सव मंडळ, न्यू सुभेदार लेआऊट अश्वमेघ गणेश उत्सव मंडळ, दिघोरी येथील नवयुवक गणेश मंडळाला त्यांनी भेट दिली.

Advertisement
Advertisement