Published On : Fri, Jul 28th, 2017

शाळांची दशा व दिशा बदलविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – सभापती प्रा.दिलीप दिवे

Advertisement

Dilip Dive
नागपूर:
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यांच्या भविष्याला नव दिशा मिळावी याकरिता शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन मनपा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी केले. साने गुरूजी उर्दू शाळेत सुरूअसलेल्या इयत्ता ७ वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक प्रशिक्षण वर्गाला आकस्मिक भेट प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती स्नेहल बिहारे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी मीना गुप्ताउपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती दिवे म्हणाले, भविष्यात प्रत्येक कार्य घरी बसून करता येणार आहे तेव्हा अश्या प्रशिक्षणाचीआवश्यकता आहे. स्वताःच्या विद्यार्थांच्या भवितव्याबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. मनपाच्याकिमान १० शाळा अश्या तयार करा ज्या नागपुरातील शाळांच्या स्पर्धेत उतरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रशिक्षणवर्गाचा लाभ सर्व विद्यार्थांपर्यंत पोहचविण्याचा आदेश सभापतींनी दिला. उपसभापती स्नेहल बिहारे यांनी महानगरपालिकेच्याविद्यार्थांचा शैक्षणिक दर्जा शिक्षकांनी उंचविण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिक्षकांनी जुनी मानसिकता बदलवून नव्या बदलांनासामोरे जाण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले.

कार्यक्रमाला सर्व शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार, प्रशिक्षण प्रमुख संध्या पवार, प्रशिक्षणसमन्वयक राजेंद्र घाईत, संजय भाटी, शेषराव उपरे, शुभांगी वाघमारे उपस्थित होते.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement