Published On : Fri, Jul 28th, 2017

सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जनाची स्वतंत्र व्यवस्था करा – मनपा आयुक्त अश्विन मुदगल – पोलिस आयुक्त कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक

Advertisement


नागपूर:
नागरिकांच्या सोयीनुसार आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तलावांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन नेमून दिलेल्या ठिकाणी करावी, तसेच घरगुती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे उपयोग करण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी करावी, असे निर्देश महानगरपालिका आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.

पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित गणेशोत्सव पूर्व तयारी आढावा बैठकीचे आय़ोजन गुरुवारी (ता. 27 जुलै) करण्यात आले होते. प्रामुख्याने पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त मनपा आयुक्त रविंद्र कुंभारे, पोलिस उपायुक्त (वाहतुक) रविंद्र सिंग परदेसी, पोलिस वाहतुक विभागाच्या झोनचे पोलिस निरीक्षक, मनपा कार्यकारी अभियंता (वाहतुक) दामोदर जांभुळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, डॉ. गजेंद्र महाले, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय ) सं.श. गायकवाड,मनपा सर्व झोनचे सहायक आय़ुक्त, मनपा जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदींची उपस्थिती होती.

गणेशोत्सवात मिरवणूकीचा मार्ग निश्चित करण्यात आला असून या मार्गावरील देखभाल दुरुस्तीचे कार्य गणेशोत्सवापूर्वीच पूर्ण करावे अशा सूचना मनपा आय़ुक्तांनी दिल्या. भाविकांच्या सोयीसाठी मूर्ती विसर्जनस्थळी सूचना फलक लावण्यात यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. सार्वजनिक गणेश मंडळांना सोयीचे व्हावे यासाठी एक खिडकी परवानही सुविधा झोनन स्तरावर देण्यासाठीही पूर्वतायारी करण्यात यावी असे निर्देश मनपा आय़ुक्तांनी दिले.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकास कामांमुळे वाहतुकीला येणा-या अडथळ्याबद्दलची माहिती पोलिस विभागाच्या अधिका-यांनी दिली. बैठकीत शहरातील नादुरुस्त सिग्नल, अतिक्रमण, तसेच विविध विकासकामामुळे खोदलेल्या फुटपाथ बद्दलचा आढावा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश आणि मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी घेतला. नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मनपाच्या प्रत्येक प्रयत्नात पोलिस विभागाचे सहकार्य राहणार असल्याची ग्वाही यावेळी पोलिस आय़ुक्तांनी दिली.

Advertisement
Advertisement