Published On : Thu, Mar 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

प्लास्टिक फुलांवर राज्य सरकारचा ‘बिग अ‍ॅक्शन’; बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा

Advertisement

मुंबई : राज्यात कृत्रिम (प्लास्टिक) फुलांच्या वाढत्या वापरावर लगाम घालण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक बंदी असतानाही बाजारात या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नैसर्गिक फुल उत्पादकांचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्लास्टिकच्या फुलांवर बंदी लागू करण्याची घोषणा केली.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाला विशेष अधिकार दिले जाणार आहेत. सजावट व्यवसाय, बँक्वेट हॉल तसेच संबंधित व्यावसायिक आस्थापनांवर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Gold Rate
Mar 21 2026 - Time 10.22Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,200 /-
Gold 22 KT ₹ 1,35,000 /-
Silver/Kg ₹ 2,30,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सरकारच्या या भूमिकेमुळे नैसर्गिक फुलांची मागणी वाढेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या तोट्याविरोधात आवाज उठवत होते.

दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत राज्यभरात 1,24,783 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3,390 प्रकरणांमध्ये कारवाई करत सुमारे 1.55 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या मोहिमेदरम्यान 67.54 मेट्रिक टन एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला असून, सरकारच्या कारवाईची तीव्रता यातून स्पष्ट होते. पर्यावरण संरक्षणासोबतच शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी ही मोहीम आणखी कठोर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारचा हा निर्णय पर्यावरणासाठी महत्त्वाचा ठरणार असून, त्याचबरोबर स्थानिक रोजगार आणि कृषीपूरक व्यवसायांना चालना देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement