
मुंबई : दहावी-बारावीच्या २०२६ बोर्ड परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीस प्रकरण आढळल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कठोर पावले उचलली आहेत. परीक्षेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरे वापरले गेले, ज्यामुळे गैरप्रकार उघडकीस आले.
मंडळाच्या माहितीनुसार, १०३ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
प्रमुख ठिकाणी कारवाई-
- बीड : चौसाळा केंद्रावर ड्रोनद्वारे सामूहिक कॉपी टिपली गेली; १७ शिक्षक व कर्मचारी निलंबित.
- छत्रपती संभाजीनगर : जैतापूर केंद्रावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २१ कर्मचाऱ्यांवर कारवाई.
- वाशिम : २२ शिक्षक व कर्मचारी निलंबित.
- गडचिरोली : एका केंद्रावर कॉपी पुरवण्याचे प्रकार समोर; कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई.
कॉपीमुक्त परीक्षा अभियान-
महाराष्ट्र सरकारने ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियानांतर्गत नियम मोडणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत केलेल्या केंद्रांवर संपूर्ण संच बदलण्यात आले. वेबकास्टिंग आणि भरारी पथकांद्वारे मंत्रालयातून देखरेख ठेवण्यात आली.
शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे की, ही कारवाई विद्यार्थ्यांच्या हितासाठी, गुणवत्तेसाठी आणि परीक्षा प्रक्रियेत शिस्त राखण्यासाठी करण्यात आली आहे. बोर्डाची ही सर्जिकल स्ट्राईक शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण करणारी ठरली आहे.








