Published On : Sat, Mar 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आजपासून दोन दिवसीय एएमएसची वार्षिक परिषद; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ येणार एकत्र

Advertisement

नागपूर : अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस (एएमएस), नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली एएमएस वार्षिक परिषद २०२६ आजपासून (१४ मार्च) सुरू होत असून ती १५ मार्चपर्यंत चालणार आहे. दोन दिवसीय या परिषदेत देशभरातील वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक आणि युवा डॉक्टर आधुनिक वैद्यकशास्त्रातील नव्या संशोधन, निदान आणि उपचार पद्धतींवर चर्चा करणार आहेत.

परिषदेचा प्रारंभ आज, शनिवार (१४ मार्च) रोजी डॉ. एम. टी. पैठणकर हॉल, आयएमए हाऊस, अंबाझरी रोड येथे रिसर्च पेपर प्रेझेंटेशन सत्राने झाला. या सत्रात विविध वैद्यकीय शाखांतील डॉक्टर आणि युवा संशोधकांनी आपल्या संशोधन निष्कर्षांचे सादरीकरण केले.

परिषदेतील मुख्य वैज्ञानिक सत्र उद्या, रविवार (१५ मार्च) रोजी हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात आधुनिक उपचार पद्धती, समकालीन शस्त्रक्रिया तंत्र तसेच निदान आणि उपचार क्षेत्रातील नव्या प्रगतीबाबत तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेदरम्यान पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना प्रोफेशनल एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रतिष्ठेचे डॉ. वऱ्हाडपांडे स्मृती व्याख्यान सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. मुकुंद थत्ते सादर करणार आहेत. कार्यक्रमात यंग अचिव्हर पुरस्कार वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे.

Gold Rate
Apr 30- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,49,400 /-
Gold 22 KT ₹ 1,38,900 /-
Silver/Kg ₹ 2,38,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही परिषद डॉ. नैनेश पटेल (अध्यक्ष, एएमएस), डॉ. शिवनारायण आचार्य (परिषद अध्यक्ष) आणि डॉ. समीर जहागीरदार (मानद सचिव, एएमएस) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे. परिषदेमुळे नागपुरात वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन आणि ज्ञानाची देवाणघेवाण होण्यास चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement