Published On : Sun, Mar 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात भर चौकात तरुणाला मारहाण; PSIच्या मुलावर आरोप,पोलिसांची निष्पक्ष चौकशीची ग्वाही!

Advertisement

नागपूर : लक्ष्मी नगर परिसरातील आठ रस्ता चौकात दोन तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेने शहरात चर्चा रंगली आहे. या प्रकरणात एका PSIच्या मुलावर मारहाणीचा आरोप करण्यात आला असून, दुसरीकडे पोलिसांनी दोन्ही बाजूंची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
जयप्रकाश किलना आणि आकाश तुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काम आटोपून घरी परतताना त्यांच्या वाहनासमोर एक कार उभी करण्यात आली. त्यानंतर वाद वाढला आणि मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. आरोपी तरुणाने “माझा बाप PSI आहे” अशी धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

घटनेनंतर दोघांनी बजाज नगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांनी सुरुवातीला मद्यप्राशन केल्याची कबुली दिली; मात्र वैद्यकीय तपासणीच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण झाला. वैद्यकीय अहवालात मद्यप्राशनाचा उल्लेख नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, बजाज नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले की, “प्रकरणाची दोन्ही बाजूंनी शहानिशा केली जात आहे. तक्रारदाराने स्वतःचे मेडिकल तपासणीबाबत नकार दिल्याची नोंद आहे. कोणत्याही दबावाखाली कारवाई होणार नाही.”

तसेच, तक्रारदाराचा एक नातेवाईकही पोलिस खात्यात कार्यरत असल्याची माहिती समोर येत असल्याने हा वाद वैयक्तिक किंवा वर्चस्वातून उद्भवला असण्याची शक्यता तपासली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या या प्रकरणात एनसीआर नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले असले तरी, सत्य परिस्थिती तपासाअंती स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement