Published On : Thu, Feb 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नितीन गडकरींविरोधात बदनामी करणाऱ्या इन्स्टाग्राम हॅन्डलरवर गुन्हा दाखल

नागपूर पोलिसांची कारवाई
Advertisement

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी तीन स्वतंत्र इन्स्टाग्राम अकाउंट्सविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित हॅन्डल्सवरून रील्स तयार करून त्यामध्ये चुकीची व भ्रामक माहिती प्रसारित करण्यात आली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नागपूर सायबर पोलिस स्टेशन येथे आयटी ऍक्ट तसेच बीएनएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Gold Rate
Feb 19th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,000 /-
Gold 22 KT ₹ 1,45,100 /-
Silver/Kg ₹ 2,49,000 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सायबर विभागाच्या दोन विशेष पथकांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित अकाउंट धारकांची ओळख पटविणे, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि तांत्रिक विश्लेषण करणे यावर भर देण्यात येत आहे.

या कारवाईवर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त रेड्डी आणि पोलीस उपायुक्त लोहित मतांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती प्रसारित केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

नागरिकांनी कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच अधिक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement