Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शरद पवार यांची प्रकृती खालावली; पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवणार

Advertisement

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत पूर्णपणे ठणठणीत नसल्याचे सांगितले जात होते; मात्र आज सकाळपासून त्रास वाढल्याने डॉक्टरांनी सखोल तपासणीचा सल्ला दिला.

सध्या शरद पवार हे बारामतीतील गोविंदबाग येथील निवासस्थानी आहेत. आज सकाळी त्यांना ताप, खोकला व कफचा त्रास जाणवल्याने डॉक्टरांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले. प्राथमिक तपासणीनंतर औषधोपचार सुरू करण्यात आले. दुपारच्या सुमारास डॉक्टरांच्या दुसऱ्या पथकानेही पुन्हा तपासणी केली.

Gold Rate
Feb 9th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,400 /-
Gold 22 KT ₹ 1,46,400 /-
Silver/Kg ₹ 2,63,000 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या तपासणीनंतर अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आज बारामतीतील काठेवाडी येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तेराव्याच्या विधीस शरद पवार उपस्थित राहणार होते. मात्र तब्येत खालावल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी उपचार सुरू असून, पुण्यात दाखल केल्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यांच्या तब्येतीबाबतची पुढील माहिती अधिकृतपणे देण्यात येईल, असेही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement