
नागपूर : श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी यांच्या वतीने ‘आयकॉन्स ऑफ बॉलिवूड’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सायंटिफिक हॉल येथे करण्यात आला होता. या कार्यक्रमात रेखा, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र व हेमा मालिनी या दिग्गज कलाकारांवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यांना प्रेक्षकांची दाद मिळाली.
संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचे संचालक समीर पंडित यांची होती. सूत्रसंचालनाची धुरा आसावरी मौंदेकर यांनी सांभाळली.
कार्यक्रमाची सुरुवात समीर पंडित यांच्या ‘गाडी बुला रही है’ या गाण्याने केली. त्यानंतर वैशाली पाऊणस्कर यांनी ‘कूछ दिल ने कहा’, दत्तात्रय वझरकर यांनी ‘गर तुम भुला न दोंगे’, धिरज पारपल्लीवार यांनी ‘ड्रिमगल’, प्रशांत अनवाने ‘मुझको इस रात की’, सुलभा तिटळे यांनी ‘अगर तुम ना होते’, या गाण्याने समा बांधला. नीरजा धांडे यांनी ‘कैसी पहेली जिंदगाणी’, समीक्षा चारडे यांनी ‘मेरे नसीब मे’, सुरभि कस्तुरीवाले यांनी ‘ए री पवन’, अंजली खोडवे यांनी तुने ओ रंगीले’, पद्मशेखर पनके यांनी ‘पल पल के पास’, सुनील माहुरकर यांनी ‘रिमझिम गिरे सावन’,अतिथि गायिका निकेता जोशी यांनी ‘पिया बावरी’, या गाण्याला वन्समोर मिळाला. ‘हवा के साथ साथ’, ‘ये दिल तुम बिन’, ‘सलामे ईश्क मेरी जान’, ‘ए दोस्ती हम नही’, ‘देखा एक ख्वाब’, ‘दिल्लगी ने दी हवा’, ‘हमसफर मेरे हमसफर’, ‘परदेसिया’, ‘तुम जो चले गये’ यासारखी द्ववगीते सादर केली.
कार्यक्रमाला परिमल जोशी, पंकज यादव, महेंद्र वाटुळकर आणि ऋग्वेद पांडे हे वादक साथसंगत केली.








