Published On : Sat, Dec 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आरटीओ चालान आकडेवारीत तफावत; 2024 मध्ये दुचाकी–खासगी कारधारकांवरच कारवाई!

माहितीच्या अधिकारात उघड
Advertisement

नागपूर : कॅलेंडर वर्ष 2024 मधील नागपूर वाहतूक पोलिसांच्या चालानांची माहिती माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत समोर आली असून, वाहनप्रकारनिहाय कारवाईत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीनुसार दोनचाकी आणि खासगी कारधारकांवरच सर्वाधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ऑटोरिक्षा आणि खासगी बसवर तुलनेने अत्यल्प चलने काढण्यात आली आहेत.

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 10,22,903 चलने काढण्यात आली.

Gold Rate
07 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,55,700 /-
Gold 22 KT ₹ 1,44,800 /-
Silver/Kg ₹ 2,55,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यामध्ये वाहनप्रकारनिहाय पाहता दोनचाकी वाहनांवर तब्बल 11,37,868 चलने नोंदवण्यात आली आहेत. त्यानंतर खासगी कारवर 69,492, ऑटोरिक्षांवर 41,121, तर खासगी बसवर केवळ 1,816 चलने काढण्यात आल्याची माहिती आहे.

इतर वाहनांमध्ये तीनचाकी टेंपोवर 4,137, चारचाकी टेंपोवर 8,386, टॅक्सीवर 2,315, शालेय बसवर 34,608, ट्रकवर 1,916, ट्रॅक्टरवर 1,229, तर जड वाहनांवर (हेवी व्हेईकल) 9 चलने काढण्यात आल्याची नोंद आहे.

गुन्ह्यांच्या स्वरूपाची आकडेवारी-
वाहतूक नियमभंगाच्या स्वरूपानुसार पाहता, हेल्मेट न घालणे या कारणासाठी सर्वाधिक म्हणजे 8,92,803 केसेस नोंदवण्यात आल्या. त्याखालोखाल ट्रिपल सीटच्या 31,516, वेगमर्यादा ओलांडण्याच्या 22,246, चुकीच्या बाजूने वाहन चालवण्याच्या 8,172, मोबाईल वापराच्या 9,255, परवाना नसताना वाहन चालवण्याच्या 5,277, तसेच इतर कारणांसाठी 46,353 केसेस नोंद आहेत.

खासगी बस कारवाईवर प्रश्नचिन्ह-
शहरातील प्रमुख चौकांवर सार्वजनिक रस्त्यावरून प्रवासी चढवणे–उतरणे, सिग्नल तोडणे आणि नियमभंगाचे प्रकार सर्रास होत असतानाही खासगी बसवर अत्यल्प चलने काढण्यात आल्याने वाहतूक विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे 20 ऑगस्ट 2025 रोजी खासगी बसांबाबत कडक आदेश देण्यात आले असतानाही, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप केला जात आहे.

आरटीआयमधून समोर आलेली ही आकडेवारी नागपूर शहरातील वाहतूक अंमलबजावणीतील असमानता आणि निवडक कारवाई दर्शवते, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement