Published On : Sat, Nov 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मेयो रुग्णालयातील एचओडीवर छेडछाडसह मानसिक छळाचा गंभीर आरोप; गुन्हा दाखल, डॉक्टरांमध्ये संताप!

Advertisement

नागपूर – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर महिला रेसिडेंट डॉक्टरने छेडछाड आणि सातत्याने मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेकडून तक्रार मिळताच तहसील पोलिसांनी संबंधित एचओडीविरोधात गुन्हा नोंदवला असून, घटनेनंतर रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवासी डॉक्टरांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे.

तक्रारीनुसार आरोपी विभागप्रमुख डॉ. मकरंद सूर्यकांत व्यवहारे (५६) यांनी ३ फेब्रुवारी ते १९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पीडितेला वारंवार अनैतिक वर्तणुकीचा सामना करायला लावला. तिच्यावर विशिष्ट पद्धतीने तयार होऊन येण्यासाठी दबाव टाकला जात असे. केबिनमध्ये बोलावून अत्यंत जवळ बसवून हळू आवाजात संवाद साधण्याचाही प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सूचना न ऐकल्यास पीडितेला अपमानित करणे, नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणे आणि सहकाऱ्यांसमोर कमीपणा आणणे, अशी वागणूक आरोपी देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततच्या अपमानामुळे अनेकदा पीडिता भावनिकरित्या खचली, परंतु तिने रडू आल्यावर आरोपीने “नाटक करू नकोस” असे म्हणत तिचा अवमान केल्याचेही आरोप आहेत.

एका प्रसंगात पीडिता रजेची अर्ज घेऊन आरोपीकडे गेली असता, अर्ज मंजूर करण्याऐवजी तिला एका असोसिएट प्राध्यापकाविरोधात खोटी तक्रार लिहिण्यासाठी दबाव आणल्याचे समोर आले. यामुळे पीडिता हादरून गेली होती.

तसेच शवविच्छेदनाच्या प्रक्रिये दरम्यान, इतर डॉक्टर उपस्थित असताना देखील पीडितेला अयोग्य रीतीने स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पीडितेने या सर्व प्रकारांविषयी सहकाऱ्यांना माहिती दिली.

डीनकडे लेखी तक्रार, रुग्णालयात तणाव वाढला-
सततच्या छळामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर मेयो रुग्णालयाचे डीन डॉ. रवि चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रार समोर आल्यानंतर रुग्णालयातील वातावरण तापले असून डॉक्टर वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तहसील पोलिसांकडून गुन्हा नोंद-
प्राथमिक चौकशीनंतर तहसील पोलिसांनी आरोपी डॉ. मकरंद व्यवहारे यांच्यावर विविध गंभीर IPC कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणावरून मेयोमध्ये मोठी हलचल निर्माण झाली असून तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement