नागपूर : कोराडी नाका येथे मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२:३० वाजता “ऑपरेशन यु टर्न” अंतर्गत पोलिसांनी वाहन तपासणी केली असता एका कारमधून ७ ग्रॅम MD सापडले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालक नशेत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे त्याचे वाहन तपासण्यात आले. तपासणीत MD आढळल्यावर एनडीपीएस टीम घटनास्थळी ताब्यात घेतली.
तपासणीच्या वेळी PSI मिश्रा नाकाबंदी ठिकाणी उपस्थित होत्या, तर PI शरद कदम यांनी तपासणीवर देखरेख ठेवली. ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी कारची सखोल चौकशी केली. वाहन चालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी नागरिकांना वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याचे आणि नशा टाळण्याचे आवाहन केले आहे.