नागपूर: मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार मा. प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतीक महोत्सव समिती व महिला जागृती जनकल्याण बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संध्याकाळी ७ ते १० दरम्यान महिलांसाठी खास रास गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत राणी यशोधराराजे भोसले, श्रीमंत राणी माधुरी राजे भोसले, बुलढाणा जिल्हा चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील व भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ. दिव्याताई धुरडे यांच्या हस्ते आरती करून करण्यात आले.
२७ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांनी तर २८ सप्टेंबर रोजी लोकप्रिय टीव्ही स्टार व अभिनेत्री सायली संजीव यांनी महिलांसोबत गरबा खेळत वातावरणात जल्लोष निर्माण केला. मुसळधार पावसातही महिलांनी रास गरबा सादर करत नारीशक्तीचा भक्कम परिचय दिला.
पारितोषिक विजेते गट:
- प्रथम पारितोषिक (₹२१,०००): शितलामाता ग्रुप
- द्वितीय पारितोषिक: गंगादेवी ग्रुप
- तृतीय पारितोषिक: स्वामीनी गरबा ग्रुप
- बेस्ट ग्रुप सन्मान: माऊली ग्रुप, वैष्णोदेवी ग्रुप, रॉकस्टार ग्रुप
या यशस्वी आयोजनासाठी सौ. अर्चना डेहनकर यांच्यासह अनिता काशीकर, रेखा निमजे, श्वेता निकम, सरला नायक, निकीता पराये, कविता इंगळे, गीता पार्डीकर, सारिका नांदुरकर तसेच आमदार सांस्कृतीक महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आमदार प्रवीणजी दटके यांचे आभार मानले.