
आकाशवाणी नागपूर च्या कार्यक्रम प्रमुख श्रीमती प्रियदर्शिनी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. आकाशवाणी या तिमाहीतील वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्रमाची निर्मिती करून अधिक राजस्व प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सचिन लाडोळे , कृषी कार्यक्रम अधिकारी यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर 2025 या तिमाहीमध्ये प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती उपस्थित सदस्यांना दिली. तिमाहीतील कार्यक्रमाचे वाचन नैमित्तिक उद्घोषक निहास लोखंडे आणि रोहिणी सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन श्यामली राऊत यांनी केले.आकाशवाणी चे सहायक निदेशक कार्यक्रम डॉ विजयसिंग राजपूत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची प्रसिद्धी आकाशवाणीच्या माध्यमातून करून आकाशवाणीचा रेव्हेन्यू वाढविण्यास हातभार लावावा ही विनंती केली. या बैठकीला कृषी, वन, मत्स्य,सामाजिक वनीकरण, पशु विज्ञान ,कृषी विज्ञान केंद्र आदी विभागाचे 20 अधिकारी उपस्थित होते.










