नागपूर – महावितरणच्या नागपूर परिमंडळ कार्यालयाचे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या सुनील गवई यांचा सुयोग नगर गार्डन मित्र परिवार आणि योग परिवारच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सुनील गवई यांना बुद्धाची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. सत्कार सोहळ्यात प्रीतम पाटील, प्रेम चोपकर, घनश्याम कातोरे गुरुजी, विष्णू कडू, जितेंद्र सावजी, प्रकाश आंबटकर, सुनील खोपे, प्रमोद भोयर, दीपक मेहर, अण्णाजी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी सुनील गवई यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच्या कार्याची स्तुती केली आणि त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक व्यक्त केले. कार्यक्रम स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.