
रेती व्यापाऱ्याचा मृतदेह कारमध्ये
चणकापूर येथील रेती व्यापारी साजन मिश्रा याचा मृतदेह पाटणसांवगीत लाहोरी बारसमोर उभ्या असलेल्या कारमध्ये आढळून आला. मिश्रा याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
एटीएम मशीनची थेट चोरी-
दरम्यान, दत्तनगर-चणकापूर परिसरातच दुसरी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एसबीआय बँकेचे एटीएम मशीनच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस तसेच झोन-५ क्राईम ब्रांचचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
दोन्ही घटना वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ सुरू आहे. ग्रामीण भागात सलग गंभीर गुन्हे घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.