Published On : Thu, Sep 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

राज्यभरात जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ११८३ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४४ प्रकरणे

अमरावती : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक पातळीवर पोहोचत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या आठ महिन्यांत राज्यभरात तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केवळ यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातच ४४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

या एकूण ११८३ आत्महत्यांपैकी ६०७ शेतकरी पात्र, तर ३०६ अपात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. क्षेत्रवार पाहता, गेल्या आठ महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विभागात ५२०, तर पश्चिम विदर्भात ७०७ आत्महत्यांची नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण १४ जिल्हे आत्महत्या-प्रवण मानले गेले आहेत. यामध्ये ६ विदर्भातील आणि ८ मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील प्रमुख कारणांमध्ये अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आणि नैसर्गिक आपत्ती हे घटक ठळकपणे पुढे आले आहेत.

तज्ज्ञ आणि प्रशासनाचा इशारा आहे की, जर शेतकऱ्यांसाठी प्रभावी मदत व दिलासा योजना तत्काळ राबवल्या गेल्या नाहीत, तर आत्महत्यांचा हा आकडा आणखी वाढू शकतो.

Advertisement
Advertisement