
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १० वाजताच्या सुमारास नंदनवन परिसरातील हिरवी लेआउटमध्ये ही घरफोडी झाली होती. फिर्यादी राहुल अशोक कुहीकर (३३, रा. हिरवी लेआउट, नागपूर) हे गणेशोत्सव पाहण्यासाठी परिवारासह बाहेर गेले असता चोरट्यांनी संधी साधली. अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील आलमारीतील रोख २० हजार रुपये, ११४ ग्रॅम सोन्याचे दागिने व ७० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ११.७० लाखांचा ऐवज लंपास केला.
या घटनेवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास करून खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपींना निष्पन्न केले.
अटक आरोपी :
१) सुजीत धनपाल बोरकर (१९, रा. सुरज नगर, वाठोडा, नागपूर)
२) रोहित बीनीराम नागोसे (२२, नागपूर)
३) त्यांचा एक विधी संघर्षग्रस्त साथीदार
आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त शिवाजीराव राठोड, उपायुक्त रश्मिता राव व सहआयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीत वपोनि विनायक कोळी, दुपोनि जसवंत पाटील, पोउपनि प्रदीप काईट, पोहवा आशिष तितरमारे, सोमेश्वर घुगल, संजय वरवारडे, प्रदीप भदाडे, संजय मुकादम व पोअं. हिमांशु पाटील यांचा समावेश आहे.पुढील तपास सुरू आहे.









