भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला साजरी होणारी हरितालिका तृतीया ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित पतीप्राप्तीसाठी उपवास पाळतात. निर्जल उपवास करून शिव-पार्वतीची आराधना करण्याची ही जुनी परंपरा आजही उत्साहाने पाळली जाते.
हरितालिकेची पौराणिक कथा-
पुराणांनुसार, देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. तिने जलाचा त्याग करून उपवास धरला आणि मनापासून प्रार्थना केली. तिच्या या निर्धारामुळे अखेर भगवान शंकरांनी तिच्याशी विवाह केला. त्या स्मरणार्थ महिलांनी हे व्रत पाळण्याची प्रथा सुरू झाली.
उपवासाचे महत्त्व-
- हरितालिकेच्या दिवशी स्त्रिया निर्जल राहून पूजा करतात.
- पतीचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबातील सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
- काही भागांत तरुणी देखील योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून हा व्रतव्रताचा संकल्प करतात.
पूजा व परंपरा-
- सकाळी स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते.
- वाळू किंवा मातीपासून शिव-पार्वतीच्या मूर्ती बनवून त्यांची स्थापना केली जाते.
- बेलपत्र, फुले, फळे अर्पण करून पारंपरिक पूजा केली जाते.
- संध्याकाळी जागरण करून हरितालिकेची कथा ऐकली जाते.
आध्यात्मिक व सामाजिक अर्थ-
हरितालिका तृतीया ही फक्त व्रताची परंपरा नाही, तर स्त्रियांच्या श्रद्धा, संयम आणि त्यागाचे प्रतिक आहे. शिव-पार्वतीच्या मूर्ती मातीपासून तयार करण्याची परंपरा पर्यावरणपूरक दृष्टिकोनही दर्शवते. या सणातून निष्ठा, श्रद्धा, भक्ती आणि निसर्गाशी असलेले नाते यांची जाणीव समाजाला दिली जाते.