नागपूर,: नागपूर महानगरपालिकाद्वारा देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.२०) विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पाळण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय सद्भावना दिनानिमित्त’ उपस्थितांना शपथ दिली.
याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे, श्री.विनय बगले, श्री. प्रमोद हिवसे यांच्यासह मनपाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
तसेच मनपा मुख्यालयातील मा. विपक्ष नेता कार्यालयात माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याशिवाय अजनी चौक येथील स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनपातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.