नागपूर – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) न्यायालयाने दिली असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
ही घटना डिसेंबर २०२४ मधील असून, तेव्हा शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी हर्षवर्धन जाधव त्यांना भेटण्यासाठी नागपूरमधील एका हॉटेलमध्ये पोहोचले होते. मात्र, सुरक्षा कारणास्तव पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. यामुळे जाधव संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांशी वाद घातला.
या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे (IPC 186) या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात सुनावणीदरम्यान पुरावे व साक्षींच्या आधारे त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला.
अखेर न्यायालयाने जाधव यांना दोषी ठरवत एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासंदर्भात जाधव यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
ही शिक्षा झाल्यानंतर जाधव यांचे पुढील राजकीय भवितव्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.