नागपूर, : नारा ESR जवळील ४०० मिमी व्यासाच्या नारा ESR शाखा फीडर जलवाहिनीत गळती आढळली आहे. सदर गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर समस्या दूर करण्यात येईल.
या दुरुस्ती कामामुळे नारा ESR क्षेत्रातील सकाळचा पाणीपुरवठा काही काळासाठी बाधित राहणार आहे.
पाणीपुरवठा बाधित होणारी क्षेत्रे:
• निर्मल सोसायटी
• आराधना कॉलनी
• शंभू नगर
• शिवगिरी लेआउट
• नूरी कॉलनी
• तवक्कल सोसायटी
• आर्य नगर
• ऑन नगर
• नरागाव
• वेलकम सोसायटी
• देवी नगर
• प्रीती सोसायटी
वरील भागातील नागरिकांना सहकार्याची विनंती करण्यात येत आहे. कृपया या काळात पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने करावा.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.