नागपूर :“स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्यलढयाचे थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यलढयातील थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
सेन्ट्रल एव्हेन्यू रोड स्थित थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळयाला आमदार प्रवीण दटके, व माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी माल्यार्पण करून करुन विनम्र अभिवादन केले. मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त श्रीमती विजया बनकर, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी कार्यकारी अभियंता श्री. राजीव गौतम, उपद्रव शोध पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबे, , श्री. अमोल तपासे, श्री. प्रमोद हिवसे, श्री. राजेश लोहितकर, श्री. विनोद डोंगरे, श्री. प्रकाश खानझोडे उपस्थित होते. तसेच गांधीसागर तलाव जवळील लोकमान्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नागरिक उपस्थित होते.