Published On : Thu, Jun 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील हुडकेश्वर परिसरात दोन बारमध्ये चोरी; अज्ञातांकडून २.३१ लाखांची रोख रक्कम लंपास

Advertisement

नागपूर – हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीत दोन वेगवेगळ्या बारमध्ये चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बारचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि काउंटरमधील गल्ल्यातून एकूण २ लाख ३१ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, जयचंद जगन्नाथ गायधने यांचा हुडकेश्वर परिसरात प्राइड बार अँड रेस्टॉरंट आहे. १० जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी बार बंद करून घरी गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी बारच्या मुख्य शटरला वाकवून आत प्रवेश केला आणि काउंटरमधील गल्ल्यातून १ लाख ५० हजार रुपये चोरून नेले.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याच रात्री चोरट्यांनी प्राइड बारपासून जवळ असलेल्या चाणक्य बार अँड रेस्टॉरंटमध्येही सेंध घातली आणि तेथून ८१ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण २.३१ लाखांची चोरी केली असून, चोरी केल्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन अज्ञात आरोपी चोरी करताना दिसून आले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हुडकेश्वर परिसरात एकाच रात्रीत दोन ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करत असून, लवकरच आरोपींचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement