Published On : Sat, May 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल तालुक्यातील पाणंद रस्त्याची केली प्रत्यक्ष पाहणी

कामाच्या गुणवत्तेत तडजोड नाही

नागपूर : शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादने वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहचविता यावीत यासाठी त्यांच्या शेतापासून रस्त्याची नितांत आवश्यकता प्रत्येक भागात असते. शेतकऱ्यांची ही अडचण दूर व्हावी याउद्देशाने या योजनेअंतर्गत आपण जिल्ह्यात सर्व तेरा तालुक्यात एकूण 649 कामांना मंजूरी दिली असून यापैकी 491 कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जी कामे हाती घेतली आहेत ती गुणवत्तेची निकष लक्षात घेऊन पूर्ण करावीत, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

काटोल तालुक्यातील नायगाव ते खाणगाव या एक किलोमीटर पाणंद रस्त्याची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: पाहणी केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान कच्चा रस्ता देण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले असल्याचे सांगितले. यात शेतकरी कोणताही वाद न आणता स्वत: पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत भिवापूर तालुक्यात 30, हिंगणा तालुक्यात 31, कळमेश्वर तालुक्यात 27, कामठी तालुक्यात 55, काटोल तालुक्यात 58, कुही तालुक्यात 73, मौदा तालुक्यात 77, नागपूर तालुक्यात 43, नरखेड तालुक्यात 57, पारशिवनी तालुक्यात 23, रामटेक तालुक्यात 32, सावनेर तालुक्यात 92, उमरेड तालुक्यात 51 अशी जिल्ह्यात एकूण 649 पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे महाराजस्व शिबीराला भेट

नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरु असलेल्या शिबीरात भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार उमेश खोडके, गटविकास अधिकारी निलेश वानखेडे व इतर अधिकारी उपस्थित होते. या ग्रामस्तरीय शिबीरात 161 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

Advertisement
Advertisement