गांधीनगर: गांधीनगर शारदा महिला मंडळ आणि भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वीत उत्तम यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात भाजपा प्रभाग अध्यक्ष सन्माननीय रविजी हलकंदर, सन्माननीय अनिलजी तातावार, सन्माननीय अजय शिवणकर तसेच महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गुंजन वैरागडे, अर्णव पळशिकर, वंशिका भारद्वाज, उत्कर्षा पांम्पट्टीवार, प्रणव अग्रवाल, सायली मिश्रा, ओमकार तातावार, शौर्य बाजपेयी, धैर्य माने, भूमिका कळंबे, अदविका आसुटकर यांचा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन मेघा परांजपे यांनी केले. प्रास्ताविक पुष्पाताई शिवणकर यांनी सादर केले, तर आभार प्रदर्शन मंजुषा तातावार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा गीता काळे, वीणा वडेट्टीवार, स्मिता केदार, माधवी मेलग, मनिषा संतोषवार, प्रियांका काळे यांनी मोलाचे योगदान दिले.
या वेळी उपस्थित पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करत मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.