नवी दिल्ली — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पाकिस्तानकडून अचानक हल्ले सुरू झाले. मात्र, भारतानेही वेळ वाया न घालवता आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोर, सियालकोट आणि फैसलाबाद या महत्त्वाच्या शहरांवर लक्ष्य साधत मोठे प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रवर्षाव, भारताची यशस्वी रोकथाम-
गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे डागली. राजस्थानच्या जैसलमेरवरच तब्बल 70 क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. मात्र, भारताच्या प्रगत हवाई सुरक्षा प्रणालीने या हल्ल्यांना यशस्वीरीत्या निष्फळ ठरवले.
AWACS यंत्रणा उद्ध्वस्त, संरक्षण केंद्रे लक्ष्य-
भारताने प्रतिहल्ल्यात लाहोरमधील पाकिस्तानची अत्याधुनिक AWACS यंत्रणा उद्ध्वस्त केली. त्याचबरोबर फैसलाबाद, सरगोधा, सियालकोट व मुलतानमधील संरक्षण केंद्रांवरही अचूक हल्ले करून त्यांना निष्क्रिय करण्यात आले आहे.
पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने पाडली, वैमानिक ताब्यात-
भारतीय वायुसेनेने तात्काळ कारवाई करत पाकिस्तानची दोन JF-17 आणि एक F-16 ही लढाऊ विमाने पाडली. या कारवाईत एका पाकिस्तानी वैमानिकाला जिवंत पकडण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
भारत साजर, सुरक्षा यंत्रणा अॅक्टिव्ह मोडवर-
संपूर्ण देशभरात भारतीय संरक्षण दल सज्ज असून पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर सखोल नजर ठेवली जात आहे. कोणतीही कुरापत सहन केली जाणार नाही, असा इशारा भारत सरकारने दिला आहे.