Advertisement
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबाराचे मंगळवारी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते. या जनता दरबारात श्री. बावनकुळे यांच्यासमोर अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. आपल्या मागण्यांची निवेदनेही श्री. बावनकुळे यांना सादर केली.
जनता दरबारात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या महसूल खात्याशी तसेच अन्य विभागांशी संबंधित समस्या श्री. बावनकुळे यांनी ऐकून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले. प्रत्येक मंगळवारी श्री. बावनकुळे यांचा जनता दरबार प्रदेश कार्यालयात आयोजित केला जाणार आहे.