नागपूर : शहरात पुन्हा एकदा रक्तरंजित घटना समोर आली आहे. यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेहेंदी बाग पुलाजवळ ताराचंद प्रजापती या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.
हत्या इतकी क्रूर होती की परिसरातील नागरिक अजूनही धक्क्यात आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं असून, यशोधरा नगर पोलिस तपासात गुंतले आहेत. हत्या कुठल्या कारणामुळे झाली, याचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.
नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रशासनाकडून खात्री देण्यात आली आहे की गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाईल. तसेच शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील.