Published On : Fri, Mar 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भाजप मुस्लिमविरोधी नाही तर पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्यांच्या विरोधात;चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

Advertisement

नागपूर : आम्ही मुस्लिम विरोधी नाही तर भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्यांच्या विरोधात आहोत, असे विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

नागपूरमध्ये उसळलेली दंगल आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे भाजपच्या विरोधात अल्पसंख्यक समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. यावरून भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. यावर बावनकुळे यांनी भाष्य केले..

Gold Rate
26 June 2025
Gold 24 KT 97,400 /-
Gold 22 KT 90,600 /-
Silver/Kg 1,07,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आम्ही मुस्लिम विरोधी नाही तर भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्यांच्या विरोधात आहोत. पाकिस्तान मॅच जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणारे जे लोक आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत, असे बावनकुळे म्हणाले. दंगलीला प्रोत्साहित करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत असा आरोपही आमच्यावर करण्यात येत आहे. मात्र यात काहीच तथ्य नाही.

पंतप्रधान मोदींचा ३० मार्चला नागपूर दौरा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० मार्चला नागपूर दौरा आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, त्यानंतर माधव नेत्रालय आणि दारुगोळा निर्माण सोलार कंपनीला ते भेट देणार आहेत. भाजपकडून प्रत्येक चौकात मोदीजींचे स्वागत केले जाणार आहे..यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement