नागपूर: नागपूर पोलिसांनी बहुप्रतिक्षित टायगर रन मॅरेथॉनचे आयोजन केले.आज २५ जानेवारी रोजी शनिवारी सकाळी पोलिस लाईन टाकळी परिसरउ त्साहाने भरलेला होता. सुमारे १०,००० सहभागींनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याने हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला.आज शनिवारची पहाट नागपूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन उगवली. एरवी शांत असणारे रस्ते पहाटे साडेचार वाजल्यापासून गजबजल्याचे पाहायला मिळाले. प्रत्यक्ष धावण्यापूर्वी नागरिकांनी गाणी, तसेच संगीताच्या ठेक्यावर वॉर्मअप केला. नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मॅरेथॉनचे उद्दिष्ट शहीद पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे, ड्रग्जमुक्त नागपूरला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांच्या निरोगी आरोग्याला प्रोत्साहन देण्यासोबतच पोलिस-जनता संबंध मजबूत करणे, सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांच्या गैरवापराबद्दल जागरूकता वाढवणे हा होता.
मॅरेथॉनला मिळाला प्रचंड प्रतिसाद –
टायगर रन मॅरेथॉनसाठी सुमारे १३,००० नोंदणी झाल्या आणि जवळजवळ १०,००० सहभागींनी शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत अनेक श्रेणींचा समावेश होता. ज्यामध्ये पुरुष आणि महिलांसाठी २१ किमी आणि १० किमी धावणे अशा दोन वयोगटात विभागले गेले होते व्यापक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, ५ किमी आणि ३ किमीच्या लहान शर्यती देखील आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये विविध ठिकाणांहून लोकांचे स्वागत करण्यात आले होते. कार्यक्रमाभोवती उत्सवाचे वातावरण होते, मॅरेथॉन मार्गावर शाळकरी मुलांनी बँड दिनचर्या आणि संगीताचे कार्यक्रम सादर केले.











