Published On : Tue, Jan 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती; २६ जानेवारीला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

नागपूर : महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे.

राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळी राज्यात फक्त २५ जिल्हे होते. नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासनिक गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. २०१४ साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता. २०१८ मध्ये राज्य सरकारच्या समितीने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता. सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी बहुतेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन २१ जिल्ह्यांची प्रस्तावित यादी-

भुसावळ (जळगाव)

उदगीर (लातूर)

अंबेजोगाई (बीड)

मालेगाव (नाशिक)

कळवण (नाशिक)

किनवट (नांदेड)

मीरा-भाईंदर (ठाणे)

कल्याण (ठाणे)

माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर)

खामगाव (बुलडाणा)

बारामती (पुणे)

पुसद (यवतमाळ)

जव्हार (पालघर)

अचलपूर (अमरावती)

साकोली (भंडारा)

मंडणगड (रत्नागिरी)

महाड (रायगड)

शिर्डी (अहमदनगर)

संगमनेर (अहमदनगर)

श्रीरामपूर (अहमदनगर)

अहेरी (गडचिरोली)

Advertisement
Advertisement