Published On : Tue, Dec 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने नागपुरात केला प्रेयसीचा खून

Advertisement

– नागपुरातील वेळा हरी गावात पुरला मृतदेह
– चंद्रपूर पोलिसांनी केला हत्याकांडाचा भंडाफोड

नागपूर – चंद्रपूर शहर पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा ओढनीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळील जंगलात पुरला. त्या पोलीस कर्मचाऱ्याला चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर या हत्याकांडाचा भंडाफोड झाला. नरेंद्र डाहूले असे आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून अरुणा काकडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

Gold Rate
26 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,37,900/-
Gold 22 KT ₹ 1,28,200/-
Silver/Kg ₹ 2,28,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अरुणा अभय काकड़े (36) या चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर येथील रहिवासी आहेत. महिलेचे देवांश जनरल स्टोर्स नावाचे दुकान आहे. त्या दुकानासाठी काही कॉस्मेटिक वस्तू विकत घेण्यासाठी २६ नोव्हेंबरला नागपुरात आल्या होत्या. तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गांधीबाग येथील नंगापुतळा परीसरात पोहचल्या. दुपारी १२ वाजता अरुणा यांनी पतीला फोन करून नागपुरात पोहोचल्याची माहिती दिली. त्यानंतर महिलेचा फोन स्विचऑफ झाला. सायंकाळ झाली तरी पत्नी घरी घरी परतली नाही, त्यामुळे तिचा पती चिंतेत पडला. त्यांनी अरुणाची शोधशोध केली आणि नातेवाईकांच्या मदतीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. तिच्या पतीने शेवटी चिमूर पोलीस स्टेशनला पत्नी हरविल्यासंदर्भात मिसिंगची तक्रार दाखल केली.

नागपुरातसुद्धा तहसील पोलिसांनी मिसिंगचा तपास सुरु केला. शेवटी चंद्रपूर पोलीस दलातील सायबर सेलने तांत्रिक तपास करीत महिलेचा सीडीआर काढला. त्यात चंद्रपूर पोलीस दलातून बडतर्फ झालेला पोलीस कर्मचारी पोलिस कर्मचारी नरेंद्र डाहूले यांच्यावर संशय आला. त्याला नुकताच चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. अरुणा काकडे हिच्या मिसिंगमध्ये त्याची भूमिका संशयास्पद वाटली. त्यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्याने अरुणाचा गळा आवळून खून केला. अरुणाचा गांधीबाग कारमध्ये ओढनीने गळा आवळला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नागपुरातील काही भागात कार फिरवली.

मात्र, जागा न मिळाल्याने तिचा मृतदेह कारमध्ये कोंबून बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळील जंगलात पुरल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे त्याला चंद्रपूर पोलिसांनी नागपुरात आणले. त्याने अरुणाचा मृतदेह पुरल्याची जागा दाखवली. चंद्रपूर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.

Ravikant Kamble

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement