नवी दिल्ली:पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला 50 कीलोग्रॅमपेक्षा जास्त वजन असल्याने अपात्र ठरविण्यात आले होते. यावर आज निर्णय होणार आहे.
विनेश फोगाटसाठी भारतीय वकील हरीश साळवे ऑलिम्पिकमधून तिला अपात्र ठरवल्याच्या प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विनेश फोगाटला 50 किलो वजनी गटातून अपात्र ठरवण्यात आले, कारण अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले होते. आता विनेशने याविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) गुन्हा दाखल केला आहे.
CAS मध्ये आज 9 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुनावणी सुरू होईल.