Advertisement
नागपूर : नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम महा मेट्रोकडून सुरू करण्यात आले आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.श्रवण हर्डीकर यांनी गुरुवारी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. हर्डीकर म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात सध्याच्या मेट्रोचे परिक्षेत्र ४४ किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या टप्प्यात 24 नवीन स्थानके बांधण्यात येणार आहेत.
मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, सध्या नागपूर मेट्रोची आर्थिक स्थिती चांगली असून प्रकल्पाच्या कामासाठी 900 कोटी रुपये त्यांच्या खात्यात आहेत.
नागपूर मेट्रोमध्ये प्रवासी संख्या सातत्याने वाढत असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एक लाख प्रवश्यांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहितीही हर्डीकर यांनी दिली.