Published On : Sat, Mar 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील कपिल नगर पोलीस ठाण्यात एसीपींच्या वाहनचालकावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने खळबळ !

Advertisement

नागपूर : शहरात पोलिसांसमोरच गुन्हेगारीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांना धाक उरला की नाही,असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यातच शहरातील कपिल नगर पोलीस ठाण्यात चक्क सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावरच कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी यात हस्तेक्षेप केल्यानंतर मोठा अनर्थ टळल्याची माहिती आहे. प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे (४२, नेमसेडा, चांदुरबाजार, अमरावती) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

माहितीनुसार, धर्माळे अगोदर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. सद्यस्थितीत ते सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या वाहनावर चालक म्हणून नेमणूकीस आहे. शुक्रवारी त्यांनी सकाळी एसीपींना कपिलनगर पोलीस ठाण्यात सोडले. त्यानंतर ते पोलीस ठाण्याच्या परिसरात गाडी साफ करत होते. त्यावेळी दिलीप रामराव चिनकुरे (५३, एन.आय.टी क्वाॅर्टर, कपिलनगर) हा तेथे पोहोचला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याने थेट धर्माळे यांच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर वार केले. त्यात धर्माळे जखमी झाले. त्याने तिसरादेखील वार केला. मात्र धर्माळे यांनी तो चुकवला तसेच आरडाओरडा केल्यानंतर पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी धावत आले आणि त्यांनी आरोपीला पडकले. धर्माळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात दिलीपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement