Published On : Mon, Nov 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी; ढगाळ वातावरणामुळे गारवा वाढला !

Advertisement

नागपूर : पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळच्या सुमारास नागपुरातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात साेमवारपासून पावसाची तीव्रता वाढणार असून गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकीकडे प्रशासन हिवाळी अधिवेशन पूर्वतयारीत गुतले असताना नागपुरात हिवाळ्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसात विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस व वादळी वन्यांची वाक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात नमूद केले आहे. शनिवारपासून विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये वातावरण बदलायला सुरुवात होईल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

Gold Rate
12 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,500 /-
Gold 22 KT ₹ 1,14,900 /-
Silver/Kg ₹ 1,55,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात सध्या ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे.
राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता –
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 24 आणि 25 नोव्हेंबरला राज्यात विविध ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तर, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने हवामानात बदल झाला आहे. यामुळे देशासह अंदमान-निकोबार बेट आणि लक्षद्वीपमध्येही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

Advertisement
Advertisement