नागपूर : राज्यात मराठा आरक्षाणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष व विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे हे पुन्हा राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहेत. ओबीसींच्या मुद्द्यांवर तायवाडे यांनी शनिवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.सरकारने ओबीसींना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असे पाटील म्हणाले. नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून याचदरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवावा, अशी मागणी तायवाडे यांनी केली.
राजकीय वर्तुळात सरकारचे सध्या एकाच समाजाकडे झुकते माप आहे, त्यामुळे सरकारने ओबीसी समाजाकडेही लक्ष द्यावे, अशी ते म्हणाले. सरकारने २९ सप्टेंबरला ओबीसींच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करू असे आश्वासन दिले. मात्र ते अद्यापही पूर्ण केले नाही. याकरिता मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याकडे लक्ष वाढल्याचे तायवाडे म्हणाले. नागपूर अधिवेशनात मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसींच्या मुद्यावरही चर्चा करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही ते म्हणाले आहेत.