Published On : Sat, Aug 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्टरावर लैंगिक छळाचा आरोप

नागपूर: शहरातील मानसोपचार विभागाच्या कंत्राटी महिला डॉक्टरने तेथील वरिष्ठ डॉक्टरांविरोधात लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्या डॉक्टरची अधिष्ठातांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावर तडकाफडकी चौकशी समिती नेमण्यात आली.

माहितीनुसार, मानसोपचार विभागात सहा महिन्यांपासून कार्यरत एका कंत्राटी महिला डॉक्टरने विशिष्ट वरिष्ठ डॉक्टर विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार केली. तक्रार आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी ४ सदस्यांची चौकशी समिती नेमली. शुक्रवारी समितीने विभागप्रमुखांसह इतर डॉक्टर आणि तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलावत सर्वांचे जबाब नोंदविले. त्यानंतर महिला डॉक्टरांच्या तक्रारीतील सत्यता तपासण्यात आली. आता समिती आपला अहवाल अधिष्ठातांना सादर करणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई होईल.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित वरिष्ठ डॉक्टर कपडे पाहून त्या महिला डॉक्टरवर शेरेबाजी करायचे. कारण नसताना आपल्या केबिनमध्ये बसवून ठेवायचा असा आरोप महिलेने केला आहे.

Advertisement
Advertisement