Published On : Fri, Aug 4th, 2023
By Nagpur Today Nagpur News

‘रेल्वे सुरक्षा…आपली सर्वांची जबाबदारी” अभियान २०२३ अंतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात

(समाजकार्य पदविका अभ्यासक्रम बॅच) यांच्या संयुक्त विद्यमाने "रेल्वे सुरक्षा..
Advertisement

मुंबई: लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती एम्.डुंगरसी महाविद्यालय (समाजकार्य पदविका अभ्यासक्रम बॅच) यांच्या संयुक्त विद्यमाने “रेल्वे सुरक्षा…

Featured Products

आपली सर्वांची जबाबदारी” अभियान २०२३ अंतर्गत दादर रेल्वे स्टेशन येथे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. तसेच महिला सुरक्षेसाठी मुंबई लोहमार्ग पोलीस यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेले ‘खाकीतील सखी ‘ या महिलांच्या सुरक्षेविषयी अभियानाची माहिती देण्यात आली.

Gold Rate
Apr 15 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,000 /-
Silver/Kg ₹ 2,56,000/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभागी होऊन सादरीकरण केले. कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. डी. व्ही. पवार, विभागप्रमुख , डॉ.विठ्ठल सोनटक्के, डॉ.घुमरे तसेच प्रा.रोहन राजापकर यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.

दादर लोहमार्ग पोलीस, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीम.स्मिता ढाकणे आणि त्यांच्या सर्व टीमने हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. लोहमार्ग पोलीस,सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रेल्वे सुरक्षा आणि माध्यमाचा सकारात्मक वापर या विषयावर तृप्ती राणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व विथ श्रद्धा या संस्थेच्या संस्थापिका श्रद्धा सिंग यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.सर्व उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement