नागपूर : शिवसेनापाठोपाठ आता राष्ट्र्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरी गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. आगामी निवडणुकांच्या तोंडावर आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठकारे मैदानात उतरले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार, असे ठाकरेंनी जाहीर केले होते. त्याची सुरुवात विदर्भातून होत असल्याची माहिती आहे.
ठाकरे विदर्भातील शिवसेनेचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना भेट देणार आहेत . ९ आणि १० जुलैला त्यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान ठाकरे कार्यकर्ते व नेते यांची भेट घेऊन त्यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार करतील, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.