Published On : Sat, Jul 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात शोरूम मॅनेजरच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : शहरातील दारव्हा रोडवर असलेल्या दुचाकी शोरूममधील मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी किन्ही शिवारात घडली. मॅनेजरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शोरूम मालकासह अन्य दोघांविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

सुरेश गुलाबराव गावंडे (वय ४८, रा. दत्तात्रयनगर, यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या दुचाकी शोरूम व्यवस्थापकाचे नाव आहे. दिलीप बोबडे (शोरूम मालक), भूषण बोबडे, सचिन बोबडे (रा. यवतमाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गावंडे अनेक वर्षांपासून यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर असलेल्या दुचाकी शोरूममध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. शोरूममध्ये अफरातफर करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. त्यामुळे तो कामावर जात नव्हता, असे सांगितले जाते. अफरातफरीच्या पैशाच्या वसुलीसाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत होता. तिघांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. गावंडे याने मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्याने गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांच्या नावांचा उल्लेख केला आहे.

Gold Rate
28 July 2025
Gold 24 KT 98,500 /-
Gold 22 KT 91,600 /-
Silver/Kg 1,13,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्याने नमूद केले होते. याप्रकरणी मृताची पत्नी ज्योत्सना सुरेश गावंडे हिने यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दुचाकी शोरूम मालक आणि उद्योजक दिलीप बोबडे, भूषण बोबडे व सचिन बोबडे यांच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement