Advertisement
नागपूर : मोमीनपुरा येथील अन्सार नगर याठिकाणी डांबून ठेवलेल्या 42 गायींची सुटका करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय पाटील, गुन्हे शाखेचे पीआय गोऱ्हे आणि डीबी पथकाच्या मदतीने मोठी कारवाई करण्यात आली.
गायींची हत्या करून गोमांस काळ्या बाजारात विक्री करण्याचा आरोपींचा धंदा असल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.