नागपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळपासून विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच या पावसामुळे बळीराजाही सुखावला असून पेरणीसाठी आता वाट मोकळी झाली आहे.
हवामान खात्याकडून येत्या काही तासांत विदर्भातील अन्य जिल्हे आणि मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस सुरू आहे. नागपुरातही रात्रीपासून पाऊस कोसळत आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाल्याने संध्याकाळपर्यंत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस विदर्भात मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.