Published On : Mon, Jun 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महराष्ट्रात येत्या ४८ तासांत मान्सून धडकणार !

Advertisement

नागपूर : गेल्या महिन्याभरापासून उन्हाच्या झळांनी त्रस्त नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी आहे. मान्सूनचे रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमन झाले आहे. येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी व कोल्हापूरचा काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. तर रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरीकोटा, धुबरी येथून मान्सूनचा प्रवास सुरू आहे. येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बरसणार असून नागरिकांना उखाड्याने दिलासा मिळेल.

Gold Rate
07 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,55,700 /-
Gold 22 KT ₹ 1,44,800 /-
Silver/Kg ₹ 2,55,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

येणाऱ्या ४८ तासांत मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिणमध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ईशान्य भागातील काही राज्य, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहार राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement