– काँग्रेस नेते राहुल गांधी आज आपला सरकारी बंगला खाली करणार आहे. ते आपला 12, तुघलक लेन येथील बंगल्याच्या चाव्या शनिवारी, 22 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयाकडे सोपवतील.लोधी इस्टेट हाऊस रिकामे करताना प्रियंका गांधी यांनीही असेच केले होते.
मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दुसऱ्या दिवशी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. अपात्र ठरल्यानंतर त्यांना 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले.
14 एप्रिल रोजी राहुल गांधींनी त्यांचे कार्यालय आणि काही वैयक्तिक सामान सरकारी निवासस्थानातून त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी हलवले. यानंतर जे काही सामान उरले होते, तेही आता त्यांनी हलवले आहे. शुक्रवारपर्यंत घर पूर्णपणे रिकामे झाले आहे. त्यांचे सामान घेऊन जाणारा ट्रक इमारतीतून बाहेर पडताना दिसला.