नवरात्री हा आदिमायेच्या शक्ती उपासनेचा व नवसृजनाचा उत्सव आहे. या काळात दुर्गामातेच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. नागपूरमधील सुप्रसिद्ध ‘रोकडे ज्वेलर्स’ येथे देखील दरवर्षी नवरात्री उत्सव अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्रोत्सवानिमित्त शोरूम मध्ये विशेष झगमगाट अनुभवायला मिळाली. आणि या काळात ग्राहकांनी देखील नेहमीप्रमाणे दागिनेखरेदीसाठी प्रचंड प्रतिसाद दिला.
तीन पिढ्यांपासून दागिनेनिर्मितीची वैभवशाली परंपरा जपणाऱ्या ‘रोकडे ज्वेलर्स’ यांनी आपल्या दागिन्यांच्या वैविध्यपूर्णता, अद्वितीय कलानिर्मिती आणि अतुलनीय शुद्धतेमुळे नागपूरकरांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आणि ते अढळ स्थान तीन पिढ्यांपासून अबाधित देखील ठेवले आहे. सर्वांचे आवडते दागिने एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे सुवर्णदालन म्हणून आज रोकडे ज्वेलर्सची सर्वत्र ओळख आहे. सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर, मोती इत्यादी पासून बनलेले नाविन्यपूर्ण दागिने हे रोकडे ज्वेलर्सचे वैशिष्ट्य आहेच. मात्र यासोबतच रोकडे ज्वेलर्सची एक खास ओळख आहे, ती म्हणजे रोकडे ज्वेलर्सतर्फे आयोजित केले जाणारे ग्राहकस्नेही दागिने महोत्सव व नाविन्यपूर्ण उपक्रम! नवरात्रीनिमित्त देखील नागपूरकरांना रोकडे ज्वेलर्सच्या लक्ष्मी नगर, इतवारी, महल व एअरपोर्ट या चारही शोरूमला सुंदर व नवीनतम आभूषणांचा नजराणा बघायला मिळाला.
यासोबतच खास नवरात्रीनिमित्त आपल्या ग्राहकांसाठी रोकडे ज्वेलर्स ‘चित भी आपकी, पट भी आपकी’ ऑफर घेऊन आले आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहकांनी ५०% रक्कम देऊन आपले दागिने बुक करायचे आहेत आणि डिलिव्हरीच्या वेळी ग्राहकांना बुकिंग दर किंवा डिलिव्हरी दर यापैकी कमी दरात दागिने घेऊन जाता येणार आहे. ग्राहक या लाभदायी ऑफरचा मोठया संख्येने फायदा घेत असल्याचे दिसत आहे. ही ऑफर २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. आपण देखील या ऑफरचा आजच लाभ घ्या.
या सणोत्सव काळात ग्राहकांची आवड आणि मागणी लक्षात घेऊन रोकडे ज्वेलर्स यांनी नवरात्रीसाठी खास कलेक्शन आकर्षक डिजाईन्ससह सर्वांच्या भेटीला आणले आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण कलेक्शन सध्यादेखील रोकडे ज्वेलर्स यांच्या सर्व शोरूममध्ये उपलब्ध आहेत. सोबतच रोकडे ज्वेलर्स यांनी डिजीटल गोल्डची ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांचा यास उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. तुम्ही देखील त्यांच्या शोरूमला भेट देऊन या दागिन्यांच्या वैशिष्टयपूर्ण कलेक्शनचा अनुभव घेऊ शकता व दागिनेखरेदी करू शकता!