Published On : Thu, Aug 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जिल्हास्तरीय १७ वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धेत पारशिवनी तालुका अव्वल

Advertisement

– शिवा अखाडा खेडी ११,नवयुवक अ.खेडी ११, जगदंबा अ.बोरी८,परमात्मा अ.निमखेडा५ पदक.

कन्हान : – आष्टेडू मर्दानी अखाडा असोशियशन व्दारे १७ वी जिल्हास्तरिय आष्टेडू शिवकालीन शास्त्रविद्या स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील अखाडा मंडळाने १३ सुवर्ण, १४ रजत व ८ कास्य असे ३५ पदक मिळवित जिल्हयात पारशिवनी तालुक्याने अव्वल स्थान पटका विले आहे.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रामटेक येथे (दि.३१) जुलै ला आष्टेडू मर्दानी अखाडा असोशियशन व्दारे १७ वी जिल्हास्तरीय आष्टे डू शिवकालीन शास्त्रविद्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आष्टे-डू मर्दानी आखाडा असोसिएशन महाराष्ट्र चे सचिव मा. राजेश तलमले, आष्टे-डू मर्दानी आखाडा असोशियशन नागपुर ग्रामिण सचिव बाबा कावरे, आष्टे-डू मर्दानी आखाडा असोशियशन नागपुर ग्रामिण प्रशिक्षक मोहन वकलकर व अखाडा वस्ताद आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित स्पर्धा घेण्यात आली. नागपुर जिल्हयातील बहुतेक मर्दानी अखाडा मंडळानी शिवकालीन शास्त्रविद्या म्हणजे काठी, भन्ना टी, तलवार, भाला, दानपट्टा आदीच्या उत्कृष्ट कलागु णाचे सादरीकरण करण्यात आले.

यात परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा निमखेडा मंडळाचे गौरव बावणे, हर्ष मल्लेवार, सावी वकलकर, छकुली बावणे या खेडाळुनी सुवर्ण पदक, सुवर्णा महेश बावणे कास्य पदक, शिवा वस्ताद दानपट्टा आखाडा खेडी चे प्रांकेत नागपुरे, प्रणव ठाकरे, अवनी कुथे, सावनी ठाकरे सुव र्ण पदक, समीक्षा नागपुरे, सोमा ठाकरे, सोम्या ठाकरे, विधी कोचे हयानी रजत पदक, प्रतिक चांभारे, प्रतिज्ञा नागपुरे, रजनी ठाकरे हयानी कास्य पदक, नवयुवक दानपट्टा मंडळ खेडी च्या नकुल ज्ञानेश्वर गजबे सुवर्ण, मोनिष विजय मरस्कोल्हे, चेतन संजय गजबे, विजय सुरेश गजबे, अश्विन तेजराम नारनवरे, सौरव हेमराज फुकटे, नंदिनी सुरेश शेंडे हयानी रजत पदक, अनुराग सुरेश शेंडे, साहील रामदास मेश्राम, कुणाल बबन नार नवरे, कुंदन सुभाष मेश्राम कास्य पदक, जगदंबा मर्दा नी आखाडा बोरी च्या विरेंद्र वैद्य, शौर्य तिरोडे, हिमांशु मंगर, अश्मिता उके सवर्ण, हर्षिका नागमोते, तनुज नागमोते, तुषार उके, विनित ऊके हयानी रजत पदक प्राप्त करून या पारशिवनी तालुक्यातील अखाडा मंडळाने १३ सुवर्ण, १४ रजत व ८ कास्य पदक असे एकुण ३५ पदक प्राप्त करून पारशिवनी तालुक्याने नागपुर जिल्हयात अव्वल स्थान पटकाविले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement