Published On : Mon, Aug 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

मागील तीन वर्षपासून तळीरामावर ड्रक अँड ड्राइव्ह ची कारवाहीच नाही

Advertisement

मागिल अडीच वर्षांपासून ब्रेथ ऍनालायझर मशीन धूळखात

कामठी :-मद्यप्राशन करून वाहन चालविताना स्वतःबरोबर रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामाना कोरोनाच्या नावाखाली मागील अडीच वर्षांपासून मोकाट रान मिळाले आहे.कोरोनाच्या संसर्गामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करायची नाही त्यांना ब्रेथ एनालायझर लावायचा नाही असे आदेश शासनाने दिल्यामुळे मागील अडीच वर्षांपासून या तळीरामाना वाहतूक पोलिसांकडून ना दंड केला जात आहे ,ना कुठली कारवाही केली जात आहे तर पोलिसांकडे असलेले हे ब्रेथ ऍनालायझर मशिन मागील तीन वर्षांपासून धूळखात पडले आहेत, यातून तळीरामाना निर्माण झालेला वाहतूक पोलिसांचा अभयपणा मुळे तळीराम आपल्याच धुंदीत वावरत आहेत.दररोज तळीराम बिअर बार वा देशी दारू च्या दुकान मधून तसेच कुठल्यातरी ढाब्यावरून दारू पिऊन निघतात परंतु वाहतूक पोलिसांना या तळीरामावर कारवाहीच करता आली नाही.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मागील अडीच वर्षात कुणीच मद्यप्राशन करून वाहन चालविले नाही असे म्हटले तर त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही मग मद्यप्राशन करून वाहन चालविण्यात आले दररोज बिअर बार व दारू दुकानातुन मद्यपी मद्यप्राशन करून दिवसा व रात्री वाहतूक करतात मग पोलीस यावर कारवाही का करीत नाही असा प्रश्न सहजच पुढे येतो परंतु कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कारवाहो होत नाही ,कारवाहो करण्यासाठी ब्रेथ एनालायझर चा वापर होत नाही याचे जणू एक आश्चर्य च आहे.तेव्हा कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आला आहे तेव्हा पोलिसांनी या तळीरामावर ड्रक अँड ड्राइव्ह ची कारवाही सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत

Advertisement
Advertisement
Advertisement